Home अनुपमा... महिला विश्व महिलादिन विशेष : समाजसेवेचा वर्षाव करणाºया ‘वर्षा मानकर’

महिलादिन विशेष : समाजसेवेचा वर्षाव करणाºया ‘वर्षा मानकर’

228

नागपूर : दुसºयाच्या दु:खानं मन द्रवित होणं त्यासोबत कृतीचा सहभाग जोडणं हा दोघांच्याही मुक्तीचा मार्ग असतो. महात्मा गांधीजींच्या या वाक्यांची मला वेळोवेळी आठवण होते़ ते वाक्य आठवलं की काहीतरी करण्याची जिद्द मनात आपोआप निर्माण होते, असे विचार आहेत वर्षा नंदकिशोर मानकर यांचे.

वर्षा मानकर सध्या (दुर्गानगर हिंगणा रोड, नागपूर) अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असल्या तरी त्यांनी समाजसेवेचे व्रतही तितक्याच जोमाने जोपासले आहे. वर्षा यांनी रद्दी से शिक्षा, ‘माया ताईला साडी’अंतर्गत निराधार महिलांना साडी चोळीचे वाटप, दिल्याने दिव्या लावूया गरिबांच्या दारी आनंद उधळूया यात दिवाळीत दरवर्षी गरीब परिवारांना किराणा व नवीन कपड्यांचे वाटप,समुपदेशन केंद्र चालविणे, शालेय साहित्य वाटप, संस्कार वर्गाचे आयोजन, स्वच्छता अभियान राबविणे, किशोरीकरिता ‘कळी उमलतांना’ उपक्रम, सुदृढ बालक स्पर्धा, बचत गट स्थापना आदींमध्ये सहभाग घेतला आहे.

त्यांनी सांगितले, की समाजसेवेचे बाळकडू मिळाले ते पती नंदकिशोर मानकर यांच्याकडून. गरिबांविषयी मनात प्रचंड आस्था आहे. गरीब मुलांसाठी बालवाड्या उघडण्यापासून सुरुवात केली़ एकलव्य बहुउद्देशीय संस्थामार्फत १० बालवाड्यांचे काम हातात घेतले़ बालवयात मिळालेले शिक्षण हे आयुष्याला आकार देत असते़ तो आकार गरिबांच्या मुलांनाही मिळावा, या उद्देशाने काम हाती घेतले.

बचत गटाच्या महिलांना एकत्र करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला. जुन्या साड्यांपासून आसन तसेच रद्दीपासून लिफाफे बनविणे यातून रोजगार मिळावा याकरिता धडपड केली आणि त्यात यशही आले.

शुभांगी नावाच्या एका सखीची बेताची परिस्थिती होती. तिला वडीलही नव्हते़ अशातच प्रकृती चिंताजनक आणि औषधांचा खर्च उचलण्यास समर्थ नसताना तिला उपचारासाठी मदत केली…आज ती एका मुलाची आई आहे़ हे केवळ समाजभानतेतून केलेले काम आहे. महिलांसाठी माता-सखी मेळावे, महिलांच्या आरोग्य व त्यांच्यावर होणाºया अत्याचाराविरोधात त्यांना समुपदेशन करून त्यांना न्याय देण्यासाठी दिवाणी न्यायालयाच्या पॅरा-लीगल समितीच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

स्वच्छतेचे भान ठेवत ब्राम्हणी गावात सतत सहा महिने स्वच्छता अभियान करत आदर्र्श गावनिर्मितीमध्ये सिंहाचा वाटा, जयताळा येथील वैकुंठ धाम येथे स्वच्छता अभियान राबवित स्वच्छ व सुंदर करण्यात आले. दारू दुकानांविरोधात संघर्ष करत वेळोवळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनसारख्या (टाळेबंदी) कठीण परिस्थितीत गरिबांना धान्याच वाटप केले़ त्यांच्या मुलांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य वाटपात सहभाग घेतला.

किशोरवयीन मुलींकरीता ‘कळी उमलतांना’ असे उपक्रप राबवित त्यांचे समुपदेशन करून समाजातील विकृत स्पर्श कशापद्धतीने ओळखावा यासाठी संवाद साधण्यात येतो. तरुणींना स्पर्धा परीक्षासंबंधी मोफत पुस्तके पुरविण्यात आले. या उपक्रमाची पुणे येथील महिला व बालविकास प्रकल्पाच्या मासिकातून दखल घेण्यात आली.

अभियातही अव्वल
वर्षा मानकर यांनी नोकरी आणि समाजकार्यासोबतच अभिनयाची आवडही जोपासली आहे. शिर्डी के साईबाबा, सबका मालिक एक है, ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ, श्रीमंतयोगी, जाणता राजा, शंभुराजे सारख्या महानाट्यात अभिनय साकारला. याशिवाय तानी, इरादा पक्का, शेगावीचा राजा या चित्रपटांतही भूमिका केली आहे.

याशिवाय त्या अनेक पदांच्या जबाबदारी सांभाळत आहे. संचालक म्हणून लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था, उपाध्यक्ष म्हणून एकलव्य बहुउद्देशीय संस्था, दक्षता कमेटीच्या सदस्य (एमआयडीसी पोलिस स्थानक), पॅरा लीगल व लोक अदालतमध्ये सदस्य, दीपस्तंभ धर्मदायी संस्थामध्ये सदस्य आणि ग्राम बालविकास संरक्षण समिती (डिगडोह, हिंगणा) याठिकाणी सचिव म्हणून कार्यरत आहे.

सन्मान प्राप्ती
बालवाड्याच्या माध्यमातून दरवर्षी सृदृढ बालक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्यांचे आरोग्य व आहारावर काम करून कुपोषणावर मात करत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडून २०२० मध्ये प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन ‘स्वामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा कामांतून ‘समाजरत्न’, तेजस्विनी, मातृशक्ती, स्वच्छतादूत पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सेवा आणि त्याग तसे निस्वार्थ भावनेतून केलेले कार्य ही ‘दगडावरील रेघ’ ठरते़ अशा कार्याचा ऐतिहासिक अभिलेख ठरत असतो़ ‘अभिवृत्त’ कडून वर्षा मानकर यांना लक्ष लक्ष शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here