Home अनुपमा... महिला विश्व महिलादिन विशेष : पल्लवी जाधव यांचा फौजदार ते मिस इंडिया स्पर्धेतील थरारक...

महिलादिन विशेष : पल्लवी जाधव यांचा फौजदार ते मिस इंडिया स्पर्धेतील थरारक प्रवास

132

 

जालना : जालन्यातील ‘दामिनी’ पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी राजस्थानमधील जयपूर येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया या स्पर्धेत उपविजेती (फर्स्ट रनर अप) होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे निश्चित महिला पोलिस वर्गात मानाचा क्षण निर्माण झाला आहे.

23 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या जयपूरमध्ये ‘ग्लॅमॉन मिस इंडिया 2020’ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जालना येथील दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक पल्लवी जाधव सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण देशभरातून यावर्षी या स्पर्धेत 70 स्पर्धक सहभागी झाले होते. यंदा पार पडलेल्या या स्पर्धेत मिसेस गटातून 33 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील दोघींचा सहभाग होता. तर मिस गटातून पल्लवी जाधव एकमेव स्पर्धक होत्या. सप्टेंबर 2019 मध्ये आॅडिशन पार पाडल्यानंतर पल्लवी यांना स्पर्धेत भाग घेता आला. जालन्यातील दामिनी पथकाच्या प्रमुख म्हणून पल्लवी जाधव दोन वर्षांपासून पदभार सांभाळत आहेत.

अभिनयही करू…
आगामी काळात संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात अभिनयही करू, अशी इच्छा पल्लवी जाधव यांनी माध्यमांजवळ व्यक्त केली. बिकट परिस्थितीचे कारण पुढे करत तरुण पिढीसमोर पल्लवी जाधव यांच्या ऊसतोड कामगार ते फौजदार आणि आता मिस इंडिया स्पर्धेतील उपविजेतेपदापर्यंतचा हा खडतर प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

‘अभिवृत्त’ च्या वतीने पल्लवी यांना खूप खूप शुभेच्छा…