महिलादिन विशेष : मूळ भारतीय लिगिया नॉरोन्हा यांची युनोमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी

अनुपमा... महिला विश्व

यंदा अमेरिकेच्या सत्तेत आलेले राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी आपल्या प्रशासनात अनेक भारतीय वंशाच्या महिलांची वर्णी लावली आहे. त्यात आता पुन्हा भारतीयांच्या अभिमानात आणखी भर घालणारी घटना समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नॉरोन्हा [ Ligia-Noronha ] यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सहाय्यक सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्या आपला भारतीय सहकारी आणि अर्थशास्त्रज्ञ सत्या त्रिपाठी यांची जागा घेणार आहेत. गुटारेस यांनी त्रिपाठी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांचे आभारही मानले आहे.

दुसरीकडे आतानोरोन्हा यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे भारतातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लिगिया नोरोन्हा एक अर्थशास्त्रज्ञ असून अनेक वर्ष त्यांनी शाश्वत विकासात भरीव कामगिरी केली आहे. तसेच त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 30 वर्षांचा तगडा अनुभव आहे. त्यांनी 2014 पासून नैरोबी येथून युनोसंबंधी आर्थिक विभागात संचालिका म्हणून काम पाहिलं आहे. त्यापूर्वी त्यांनी नवी दिल्लीतील ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (टेरी) मध्ये कार्यकारी संचालिका म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, त्यांनी संसाधन, नियमन आणि ग्लोबल सिक्युरिटी सेक्शनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिले आहे.

अलीकडच्या काही काळात संयुक्त राष्ट्र संघटना अर्थात युनोमधील विविध संस्थामध्ये भारतीय महिलांची संख्या वाढत चालली आहे. मागील आठवड्यात सरचिटणीस गुटारेस यांनी गुंतवणूकविषयक तज्ज्ञ उषा राव मोनारी यांची संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *