भंडारा येथील रोजगार सेवकावर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई

पूर्व विदर्भ

भंडारा : ग्रामपंचायत इंदूरखा (जि. भंडारा) येथील रोजगारसेवक प्रल्हाद तातोबा पुडके (52 वर्षे),
यांनी दोन रुपयांची लाच रक्कमचे मागणी करून पहिला हप्ता एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ( anti corruption bureau ) कारवाई केली.
सविस्तर असे की, यातील तक्रारदार हे इंदूरखा, जि. भंडारा येथील रहिवासी असून ते मजुरीचे काम करतात. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. घराचा पाया पूर्ण करण्यासाठी त्यांना शासनाकडून 20 हजार रुपये मिळाले आहेत. झालेल्या कामाचे मस्टर भरण्याकरीता तक्रारदाराने ग्रामपंचायत इंदूरखा, जि. भंडारा येथील रोजगार सेवक यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांचे मस्टर भरण्यासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. तसेच, पहिला हप्ता म्हणून हजार रुपये येताना घेवून येण्यास सांगितले. तक्रारदार यांना रोजगार सेवक प्रल्हाद तातोबा पुडके यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (भंडारा) येथील कार्यालयात प्रल्हाद तातोबा पुडके यांचेविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिस निरीक्षक योगश्वर पारधी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहनिशा करून सापळा कारवाईचे
आयोजन केले. त्यामध्ये पडताळणीदरम्यान आरोपी प्रल्हाद तातोबा पुडके यांनी तक्रारदाराच्या झालेल्या कामाचे मस्टर भरण्याकरीता दोन रुपयांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून एक हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी रश्मी नांदेडकर पोलिस अधीक्षक लाप्रवि नागपूर परिक्षेत्र, राजेश
दुद्दलवार अपर पोलिस अधीक्षक नागपूर परिक्षेत्र, मिलींद तोतरे, अपर पोलिस अधीक्षक नागपूर
परिक्षेत्र, महेश चाटे पोलिस उपअधीक्षक, लाप्रवि. भंडारा यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक
योगेश्वर पारधी, पोहवा संजय कुरंजेकर, पो.ना. कोमल बनकर, सुनिल हुकरे, कृणाल कढव सर्व ला.प्र.वि. भंडारा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *