Home राष्ट्रीय इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज...

इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

53

नवी दिल्ली : इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या [ parliament ] दोन्ही सभागृहांचे कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

आज सकाळी कामकाज सुरू होताच पेट्रोल डिझेल तसेच गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केली. काँग्रेस, डावे पक्ष द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला [ om birla ] यांनी सदस्यांनी जागेवर जाण्याचे आवाहन करून प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. मात्र, गदारोळ कायम राहिल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उपाध्यक्ष हरीवंश यांनी दोनवेळा कामकाज तहकूब केले.