Home उपराजधानी नागपूर नागपुरातील शासकीय जमिनीचे भाडे थकविल्याबाबत बारा संस्थांची चौकशी सुरू, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...

नागपुरातील शासकीय जमिनीचे भाडे थकविल्याबाबत बारा संस्थांची चौकशी सुरू, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

59

मुंबई : नागपूर शहरात एक रुपया लीजवर शासनाकडून सामाजिक कामांसाठी जागा घेऊन ज्या बारा संस्थांनी शासकीय जमिनीचे भाडे थकविले आहे, त्यांची उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात [ balasaheb thorat ] यांनी विधानपरिषदेत दिली. नागपूर शहरातील शासकीय जमिनींचे भाडे संस्थांनी थकविल्याबाबत सदस्य प्रवीण दटके [ praveen datake ] यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

शासकीय जमिनीचे भाडे थकविणाºया बारा संस्थांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित संस्थांबाबत भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीनुसार जमीन वापराबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मुंबईतील गोरक्षक मंडळाने गाय चराईसाठी जी शासकीय जमीन घेतली होती, त्यामध्ये गैरप्रकार झाले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असेही महसूलमंत्र्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आर्वी तालुक्यातील शेतकºयांना सिंचन विहीर योजनेचे अनुदान पंधरा दिवसांत देणार

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील शेतकºयांना सिंचन विहीर योजनेचे अनुदान येत्या पंधरा दिवसात वितरित करण्यात येईल अशी माहिती रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

सिंचन विहीर योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यासाठी नऊ कोटी 93 लाख रुपयांची तर आर्वी तालुक्यासाठी चार कोटी 58 लाख रुपयांची मागणी आलेली आहे, अशीही माहिती मंत्री श्री. भुमरे यांनी दिली.