Home राष्ट्रीय उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांचा राजीनामा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांचा राजीनामा

50

डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन येथे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे राजीनामापत्र सादर केले.
माहितीनुसार, भाजप नेतृत्वाने राज्यातील नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात रावत यांना राजधानी दिल्लीत बोलवण्यात आले होते. यानंतर त्यांनी हे पद सोडल्याचे सांगण्यात येते.

अन्य एका माहितीनुसार, निरीक्षकांच्या अहवालानंतर भाजपने रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. आता नवीन मुख्यमंत्र्यांसाठी लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे.
दुसरीकडे राज्यसभा सदस्य अनिल बलुनी, लोकसभाचे खासदार अजय भट्ट आणि धनसिंग रावत या पदाच्या शर्यतीत पुढे आहेत. तिघांपैकी कोणालाही नवीन मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here