नागपूर : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदावर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या. आता या मंडळाचे पुनर्गठन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. सदर पद हे मंत्री दर्जाचे आहे. मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय समितीत उपाध्यक्ष पदावर उपमुख्यमंत्री अजित पवार, समिती सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा समावेश आहे.