Home राष्ट्रीय देशातील बँका चार दिवसांपर्यंत बंद

देशातील बँका चार दिवसांपर्यंत बंद

39

नागपूर : सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी सरकारी बँका आणि काही जुन्या खासगी बँकांनी (Old Private Banks) येत्या 15 आणि 16 मार्च रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे आजपासून एकूण चार दिवस बँका बंद राहतील.
चालू आर्थिक वर्षात आयडीबीआय बँकेव्यतिरिक्त दोन सरकारी बँका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या निर्णयाच्या विरोधात देशभरातील नऊ बँक कर्मचारी संघटनांची महासंघटना असलेल्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने (UFBU) 15 आणि 16 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. याशिवाय आज दुसरा शनिवारी आणि उद्या रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने चार दिवस बँका बंद राहण्याची स्थिती निर्माण झाली.परिणामी बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे या चार दिवसात एटीएम सेवा सुरू राहील; परंतु चेक क्लिअरन्स, नवीन खाती उघडणे, डिमांड ड्राफ्ट जारी करणे आणि कर्ज प्रक्रिया या सेवांवर 17 मार्चपर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकमत 18 ने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here