Home उपराजधानी नागपूर नागपुरात 15 ते 21 मार्चपर्यंत संचारबंदीसह कडक लॉकडाऊन

नागपुरात 15 ते 21 मार्चपर्यंत संचारबंदीसह कडक लॉकडाऊन

29

नागपूर : नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाºया सर्व वस्त्यांमध्ये उद्या 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिक संघटनांनी शनिवारी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत [ energy minister niteen raut ] यांची भेट घेतली. या सर्व संघटनांनी नागरिकांच्या जीवित्वाला अधिक महत्त्व देत या काळात प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

नागपूरमध्ये सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोजचा आकडा हजारांच्यावर गेला असून, रस्त्यावरील व बाजारातील गर्दी कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी किमान आठवडाभर लॉकडाऊन करण्याबाबत उच्चस्तरीय अधिकाºयांचे एकमत झाल्यानंतर गुरुवारी दुपारी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. शहरातील नागरिक व व्यावसायिकांना पुरेसा दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. शनिवार-रविवार या दोन्ही दिवसात गरज नसेल तर घराबाहेर नागरिकांनी पडू नये असे आवाहनही करण्यात आले होते. तथापि, ही बाब पुरेशी नसल्याने सोमवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात संचारबंदी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर रेसिडेन्सी हॉटेल शिष्टमंडळ, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ, कूलरनिर्मिती व्यवसायिक, फुलांचा व्यवसाय करणारे, बांधकाम व्यवसायिक, आॅरेंज सिटी स्टोन क्रशर असोसिएशन व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांची शनिवारी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सर्व शिष्टमंडळांना एक आठवडा सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या जीवित्वास सर्वोच्च प्राथमिकता देणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागणार असले तरीही आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या सूचनेनुसार ही सक्ती करावी लागत आहे. व्यापक हीत लक्षात घेता सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

खनिजपट्टा मुदत वाढविण्यासाठी निवेदन

कोविड -19 [ kovid -19 ] महामारीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे उद्योगांवर अनेक निर्बंध आलेत. लॉकडाऊन व निबंर्धामुळे राज्यातील खाजगी व शासकीय बांधकामे बहुतांशी बंद होते. तसेच अजूनही या परिस्थितीत विशेष बदल झाला नाही. या सर्व बांधकामावर दगड, गिट्टी, मुरुम यांचा पुरवठा होत असतो. याशिवाय खाण उद्योगाला लागणारे मजूर प्रामुख्याने परप्रांतीय आहेत. लॉकडाऊनमुळे हे परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात परत गेले आहेत. यामुळे खनिज उद्योग पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. अनेक खनिजपट्टाधारकांनी यंत्रसामुग्रीसाठी बँकांकडून कर्जही घेतले आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करून खाण चालविण्यास लागणाºया खनिजपट्टयाची मुदत त्या-त्या खनिजपट्टयाच्या समाप्ती तारखेपासून सरसकट एक वर्षांची मुदत वाढवून देण्यात यावी, असे निवेदन खाण उद्योजकांमार्फत आॅरेंज सिटी स्टोन क्रशर असोशिएनचे अध्यक्ष रमेश गिरडे यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here