Home उपराजधानी नागपूर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

49

नागपूर : भाजप नेते तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस [ devendra fadanvees ] यांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शनिवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवडप्रक्रिया पार पडली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवड करण्यात आली. याशिवाय आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड झाली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, युनो अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक परिषदेशी (इकॉनॉमिक काऊन्सिल) संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here