Home उपराजधानी नागपूर मोठ्ठी बातमी : वर्धा, पुलगांव मार्गे धावणार बुलेट ट्रेन

मोठ्ठी बातमी : वर्धा, पुलगांव मार्गे धावणार बुलेट ट्रेन

100
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर : मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी (Bullet Train) लिडार सर्व्हेचे काम सुरू झाले असून, पुढील काही दिवस ते सुरू राहणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा मार्ग वर्धा, पुलगांव मार्गे जाणार आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कापोर्रेशनच्या वतीने हवाई मार्गाद्वारे लिडार यंत्रणेद्वारे सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. 736 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर आणि मुंबई अशा स्थानकांचा यात समावेश आहेत.

लिडार यंत्रणा
मुंबई नागपूर मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लिडार (Light Detection and Ranging) यंत्रणा विमानात बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा 100 मेगापिक्सेल कॅमेºयाद्वारे जागेचे चित्रीकरण करते.त्यानुसार जागेवरील झाडे, रस्ते, पायवाटा, टेकड्या, पिके आदींची माहिती मिळवता येते.