Home उपराजधानी नागपूर सरकार कोरोना विषाणूसंबंधी बाबींचे दस्तऐवजीकरण करणार

सरकार कोरोना विषाणूसंबंधी बाबींचे दस्तऐवजीकरण करणार

47

नागपूर : राज्य सरकारने कोरोना विषाणू संदर्भातील सर्व बाबींचे दस्तऐवजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील हा एक अनोखा उपक्रम असून, ही कागदपत्रे लवकरच प्रकाशित केली जातील, अशी माहिती, मुख्यमंत्र्यांचे कोविडविषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली़

कोरोना [ kovid -19 ] हा संसर्ग पूर्णपणे नवीन होता. यासंदर्भात सर्व वैद्यकीय उपचार संबंधित कागदपत्रं एकाच खंडात ठेवली जाणार आहेत, तर एक खंड सामान्य लोकांसाठी असेल. यामध्ये जिल्हा तसंच विभाग स्तरावरच्या माहितीचा समावेश असेल.

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०२० पर्यंतची माहिती गोळा केली जात असून तांत्रिक बाबी इंग्रजीमध्ये तर इतर सर्व मुद्दे मराठीतून प्रकाशित केले जाणार असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. आकाशवाणीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.