Home साहित्य-संस्कृती काव्यभिलाषा चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला

चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला

229

सपान…

चांदणं पडलं रातीला सपान आलं
चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला

चांदणं पडलं रातीला सपान आलं
जग झालं विश्रांत
चल घेऊ मोकळा श्वास
श्वासात अडकला प्राण सख्या
घेऊ हातात हात…

चांदणं पडलं रातीला सपान आलं
सख्या का असा लांब मजसी घे कुशीत
कर शांत या देहास
वेच तू यौवन ओंजळीत…

चांदणं पडलं रातीला सपान आलं…

नूतन झाडे-मोरे
नागपूर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here