Home आध्यात्मिक क्रोधाचे प्रेमात रुपांतर

क्रोधाचे प्रेमात रुपांतर

49

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

 


प्रत्येक दिवशी अशा घटना घडतात ज्यांचे आपल्याला वाईट वाटते. कधी कधी भयंकर रागही येतो जेव्हा कुणी आपल्याला दुखावतो अथवा आपल्याला नाराज करतो. अशी देखील उदाहरणे आहेत, की दुसºयाची हानी होताना व केलेला आघात पाहून आपल्याला राग येतो. कधी कधी समाजातील एखाद्या समूहावर अन्याय होताना व सहन करताना सुद्धा बघायला मिळते. या सर्व प्रसंगी आपल्याला वाटते की नाही, काही तरी चुकीचे घडत आहे. जे काही घडत आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. फरक फक्त्त एवढाच आहे, की त्या अन्यायाकडे आपण आपली प्रतिक्रिया कशी व्यक्त करतो? आपण निर्णय कसा घेतो? एकतर रागाने प्रतिक्रिया व्यक्त करतो किंवा रागावर नियंत्रण ठेऊन त्याचे प्रेमात रुपांतर करतो. मदर टेरेसा यांनी क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा निर्णय घेतला होता.

जगात क्रोध व हिंसा भरलेली आहे. प्रत्येक गावात, शहरात, घराघरांमध्ये रागाचा विस्फोट होताना दिसतो. या रागामुळे क्रोधामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न होतो. आपण रागावर पंखा चालवून त्याला विझवू शकत नाही. आपण या क्रोधाच्या अग्नीला प्रेमाच्या पाण्याने विझविले पाहिजे. क्रोधाच्या अग्नीला अग्नीने शांत करता येत नाही. रागाच्या या अग्नीला आपण प्रेमाने शांत करू शकतो. कोणतेही भांडण झाल्यास रागाने बोलण्याऐवजी प्रेमाने बोललो तर समोरच्याचा राग शांत होतो. वातावरणात रागीट विचारांचे तरंग वाढविण्याऐवजी आपण प्रेमपूर्ण विचार पसरवूया, जेणेकरून वातावरण चांगले राहील.

या जगात सगळीकडे क्रोध व हिंसा पसरलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी या जगात शांतता व प्रेमाचे भान ठेवूया. चला तर, या रागाला प्रेमाने जिंकूया आणि मग बघा आपल्या अशा वागण्याने प्रेममय लहरी सर्वत्र पसरतील आणि सगळीकडे शांतता व प्रेम नांदेल. मग तो दिवस दूर नाही की हे सर्व जग सुख, शांती व प्रेमाचे आश्रयस्थान बनेल.

 

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here