Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्या कमी होणार...

मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्या कमी होणार की नाही, याबाबत केवळ चर्चा सुरू आहे़

36
  • पेट्रोल-डिझेलपासून केंद्र सरकारची मोठ्ठी कमाई

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे [ PETROL DIESEL HIKE ] नागरिक हैराण झाले असताना केंद्राच्या तिजोरीत मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर मोठा महसूल जमा केल्याचे संसदेत सांगितले आहे.

माहितीनुसार, 6 मे 2020 पासून केंद्र्र सरकारने प्रतिलिटर पेट्रोलवर 33 रुपये तर प्रतिलिटर डिझेलवर 32 रुपयांचा कर लावला आहे. यात एक्साईज कर, सरचार्ज आणि सेस यांचा समावेश होतो. मागील वर्षी मार्च आणि मे महिन्याच्या दरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास 6 मे 2020 पासून सरकारला प्रतिलिटर पेट्रोलमागे 23 रुपये तर डिझेलमागे 19 रुपये महसूल म्हणून मिळायचे.

1 जानेवारी ते 13 मार्च 2020 या दरम्यान प्रतिलिटर पेट्रोलवर 20 रुपये तर प्रतिलिटर डिझेलवर 16 रुपये इतका कर लावण्यात आला होता. तसेच, 6 मे 2020 पासून सरकारने प्रतिलिटर पेट्रोलवर 33 रुपये तर प्रतिलिटर डिझेलवर 32 रुपयांचा कर लावला आहे. अर्थातच 1 जानेवारी 2020 पासून सरकारने प्रतिलिटर पेट्रोल मागे 13 रुपये आणि प्रतिलिटर डिझेलमागे 16 रुपयांची वाढ केली आणि तेवढ्याच प्रमाणात कर गोळा केला.

दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या अबकारी कराचा वापर हा विकासकामांसाठी केला जात असल्याचे समर्थन अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर [ ANURAG THAKOOR ] यांनी केले. तसेच, इंधनाला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्या कमी होणार की नाही, याबाबत केवळ चर्चा सुरू आहे़ शिवाय समाजातील कोणत्याही स्तराकडून त्याविरोधात ओरड होत नसल्याचे दिसून येते़ रोज मरे त्याला कोण रडे, या म्हणीप्रमाणे सर्व खेळ सुरू असल्याच्या भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here