निर्मला सीतारामन् म्हणतात, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी अंतर्गत आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

राष्ट्रीय

PETROL – DIESEL HIKE : पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवाकराअंतर्गत (GST) आणण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने सोमवारी लोकसभेत स्पष्ट केले. याबाबतीत वस्तू आणि सेवाकर परिषदेने (GST COUNSIL) कोणतीही शिफारस केली नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् ( NIRMALA SEERAMAN ) यांनी लोकसभेत दिली.

योग्य वेळ आल्यावर पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवाकराच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जाईल, असेही सीतारामन् यांनी स्पष्ट केले. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे खासगीकरण केले नसल्याचे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले. मात्र, एलआयसीच्या भांडवल वृद्धीसाठी, महामंडळाचे समभाग विक्रीकरता उलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *