Home राजधानी मुंबई राज्यभरात सुमारे ५० हजारांहून अधिक बँक कर्मचाºयांचा संपात सहभाग

राज्यभरात सुमारे ५० हजारांहून अधिक बँक कर्मचाºयांचा संपात सहभाग

41

मुंबई : राज्यभरात सुमारे दहा हजार बँक शाखांमधील ५० हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती युनायटेड फोरम आँफ बँक आँफ युनियन्सचे [ UNIATED FORUM OF BANK OF UNIONS ] समन्वयक देविदास तुळजापूरकर यांनी दिली. कोविड पार्श्वभूमीवर, धरणे अथवा मोर्चे काढले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकांचे खासगीकरण धोरणांच्या विरोधात देशभरातील बँक अधिकारी आणि कर्मचारी कालपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत संप सुरू राहणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कर्मचारी तर परभणी जिल्ह्यातील १०२ बँक शाखांमधले साडे चारशे अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. मात्र, बँकेच्या नेट बँकिंग [ NET BANKING ] , मोबाईल बँकिंग, एटीएम [ ATM ] सुविधा सुरळीत चालू राहतील,अशी माहिती संघटनेचे सचिव सुनील हट्टेकर यांनी दिली. (प्रतिकात्मक छायाचित्र)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here