Home राष्ट्रीय गर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी

गर्भपातासाठी जास्तीत जास्त 24 आठवड्यापर्यंत मंजुरी

71

नवी दिल्ली : राज्यसभेने आज मंगळवारी ‘मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नसी’ ( medical termination of pregnancy amendment bill 2020 ) दुरुस्ती विधेयक 2020 ला मंजुरी दिली. लोकसभेने यापूर्वीच ते पारित केले आहे. या विधेयका अंतर्गत गर्भपातासाठी [ abortion ] जास्तीत जास्त मंजुरी सध्याच्या 20 आठवड्याऐवजी 24 आठवड्यापर्यंत केली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले, की व्यापक विचारविनिमयानंतर हे विधेयक तयार करण्यात आले आहे. हे विधेयक प्रदीर्घ काळ प्रतीक्षा यादीवर होते. मागील वर्षी ते लोकसभेत एकमताने मंजूर झाले आहे. विधेयक तयार होण्यापूर्वी जगभरातील कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. यानंतर सभागृहाने आवाजी मताने विधेयक मंजूर केले. वास्तविकपणे, गर्भपाताशी संबंधित सध्याच्या कायद्यामुळे बलात्कार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेला खूप समस्या येत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here