Home राष्ट्रीय जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये भारतामधील ‘इतक्या’ शहरांचा समावेश, अतिशय धक्कादायक

जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये भारतामधील ‘इतक्या’ शहरांचा समावेश, अतिशय धक्कादायक

158

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये भारतामधील 22 शहरांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. इतकेच नव्हे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी असलेल्या शहरांमध्ये दिल्ली पहिल्यास्थानी आहे. मंगळवारी स्विस संस्था ‘आयक्यू एअर’ ( IQ AIR ) ने तयार केलेल्या ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२०’ ( WORLD AIR QUALITY REPORT 2020 ) मध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.

माहितीनुसार, सन 2019 च्या तुलनेत दिल्लीची हवेची गुणवत्ता 2020 मध्ये सुधारली असल्याचे नमूद केले आहे; परंतु या सुधारणांनंतरही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा दहावा क्रमांक लागतो. राजधानीच्या शहरांबद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत सर्वांत वर आहे. कारण दिल्ली, गाझियाबाद, बुलंदशहर, बिसारख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मेरठ, आग्रा, मुझफ्फरनगर, भिवाडी, फरीदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंधवाडी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक, धारुहेरा, मुझफ्फरपूर ही तब्बल 22 शहरे देशातील आहेत. भारतातील प्रदूषणाचे मुख्य कारण वाहतुकीसंबंधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय अहवालानुसार जगातील चीनमधील सर्वाधिक प्रदूषित शहर झिनजियांग आहे. त्यानंतर पहिल्या 10 शहरांपैकी 9 शहरे भारताची आहेत. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत गाझियाबाद दुसºया क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ बुलंदशहर, बिसारख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ आणि भिवाडी आहे. या शहरांमधील प्रदूषणाची पातळी पीएम 2.5 च्या आधारे मोजली गेली आहे.
विशेष म्हणजे अहवालात कोरोना महामारी काळातील टाळेबंदीचे () दुष्परिणाम आणि जगभरातील पीएम 2.5 प्रदूषकांमधील बदलाचेही या अहवालात वर्णन केले आहे.

भारतातील प्रदूषणाचे मुख्य घटक
* वाहतूक
* स्वयंपाकासाठी इंधन
* वीज निर्मिती
* उद्योग
* उत्पादन कार्य
* कचरा जाळणे