Home राजधानी मुंबई वैदर्भिय हेमंत नगराळे मुंबई पोलिस आयुक्तपदी

वैदर्भिय हेमंत नगराळे मुंबई पोलिस आयुक्तपदी

128

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिस दलावर ( mumbai police ) टीका होत असतानाच सरकारने मुंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे (commissioner hemant nagrale) यांची नियुक्ती केली आहे. सरकार अडचणीत आले असताना आयुक्तपदाची धुरा नगराळे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

हेमंत नगराळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील असून, जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक सहावीपर्यंचे शिक्षण झालो नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. 1987 साली
आयपीएस झाल्यानंतर त्यांच्यावर पहिली मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आली. 1992 ते 1994 या काळात सोलापूर जिल्ह्यात डीसीपीचा कार्यभार सांभाळल. 1992 ते 1993 च्या दंगली दरम्यान सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली.

1994 ते 1996 दरम्यान रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून दाभोल पॉवर कॉपोर्रेशनशी संबंधित जमीन अधिग्रहण प्रकरण योग्य पद्धतीने सोडवले. 1996 ते 1998 या काळात सीआयडी क्राईमचे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

दरम्यान, हेमंत नगराळे यांच्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताना अनेक आव्हाने समोर असेल. सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर लागलेला डाग पुसून काढत शहरात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तारेवरची कसरत नगराळे यांना करावी लागणार हे निश्चित!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here