Home राष्ट्रीय देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाºया संस्थांना पाठबळ देणार : पंतप्रधान

देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाºया संस्थांना पाठबळ देणार : पंतप्रधान

61

नवी दिल्ली : देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाºया संस्थांना पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी [ pm modi ] यांनी जाहीर केले. ते बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ‘दूरदृश्य संवाद प्रणाली’च्या माध्यमातून बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी, अशी विनंती केली. त्यावर पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरात अशा संस्थांना पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

पंतप्रधानांनी यावेळी गेल्या आठवडाभरात देशातील ७० जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढल्याकडे लक्ष वेधत कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोविडविरोधातील लढाईत आजवर मिळालेले यश, थोड्याशा बेजबाबदारपणामुळे हातातून निसटून जायला नको, असे पंतप्रधान म्हणाले.