Home ब्लॉग प्रदूषण रोखण्यात आपण इतके कोते कसे…

प्रदूषण रोखण्यात आपण इतके कोते कसे…

120

नूतन मोरे

जमिनीतील पाण्याचा प्रचंड उपसा, लहान मोठ्या नद्यांचा प्रवाह बदलवणे वा त्या बुजवणे, रासायनिक पदार्थांचा वारेमाप वापर अशा अनेक कृत्यांतून मानवाने निसर्गाच्या विरोधात मागील अनेक दशकांपासून आपल्याच पायावर कुºहाड मारून घेतली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणेच आपणही त्यापासून अलिप्त नाही आहोत.

मागील दिवसांत स्विस संस्था ‘आयक्यू एअर’ने तयार केलेल्या ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२०’ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये भारतामधील 22 शहरांचा समावेश असल्याचेही बाब नमूद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी असलेल्या शहरांमध्ये दिल्ली पहिल्यास्थानी आहे. धक्कादायक आणि तितकीच धोकादायक बाब म्हणजे यात पहिल्या 10 शहरांपैकी 9 शहरे भारताची आहेत. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत गाझियाबाद दुसºया क्रमांकावर आहे. (यात पहिल्यास्थानी चीनमध्ये झिनझियांग शहराचा समावेश आहे.) त्या पाठोपाठ बुलंदशहर, बिसारख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ आणि भिवाडी आहे.

आपल्या देशाला प्रदूषणाची फार मोठी समस्याचा शाप लागल्याचे चित्र यातून दिसून येते. कारण बेफिकीरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माझ्या एकट्यानेच काय होणार, ही मानसिकता कुणीही सोडायला तयार नाही आणि मग त्यातून असा स्फोट होतोय. बेसुमार जंगलतोड, जमिनीत पावसाचे पाणी न मुरणे, नद्यांचा प्रवाह रोखणे, प्लास्टिमुळे कचºयांचा ढिग, जमिनीतील पाण्याचा प्रचंड उपसा, लहान मोठ्या नद्यांचा प्रवाह बदलवणे वा त्या बुजवणे, रासायनिक पदार्थांचा वारेमाप वापर अशा अनेक कृत्यांतून मानवाने निसर्गाच्या विरोधात मागील अनेक दशकांपासून आपल्याच पायावर कुºहाड मारून घेतली आहे. जगातील अन्य देशांप्रमाणेच आपणही त्यापासून अलिप्त नाही आहोत.

भारतात अन्य प्रदूषणापेक्षा वायू प्रदूषण [ air pollution ] सर्वाधिक आहे़ नादुरुस्त होईपर्यंत वाहनाचा वापर, हा मानसिक रोगही आपल्या देशात दिसून येतो. आणि मग संबंधित वाहनाची क्षमता नसतानाही ते रस्तोरस्ती धावते. यातून होणारे प्रदूषण वातावरणात पसरते़ त्यामुळेच भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भंगार वाहन धोरण’ [ scrap vechile policy ] लागू केले आहे़ यानुसार १५ वर्षांनंतरची वाहने भंगारात जाणार आहेत.

भारतात दरवर्षी उष्णतेचे नवनवे विक्रम होत आहेत. पारा तब्बल ५० अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने जगणे असह्य झाले आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतातील १० शहरांचे तापमान जागतिकस्तरावर पोहोचले होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर हे शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये गणले जात आहे. देशातील काही भागात एवढी उष्णता वाढेल की त्या वातावरणात जगणेही कठीण होईल, अशी भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. कार्बन उत्सर्जन वाढत असल्याने पृथ्वीचे तापमान येत्या शतकांपर्यंत २ ते ४ अंश इतके वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ भारतातच नाही तर चीन, ब्राझील, स्पेन, नेपाळ आणि झिबॉम्बे या देशांचाही यात समावेश आहे.

आॅगस्ट २००३ मध्ये फ्रान्समध्ये अशीच उष्णतेची लाट आली होती. या लाटेत सुमारे १५ हजार जणांचा बळी गेला होता. त्यावर्षी तापमानाने ४४ अंशांचा आकडा गाठला होता. रात्रीसुद्धा किमान तापमान २० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होते. जागतिक तापमानवाढीचा परिणाम केवळ निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून तो आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यावरसुद्धा होत आहे. अंतर्गत हालचालींमुळे भूगर्भातील हालचाली वाढतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे दोन्ही ध्रुव थरथरत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. आता हे सर्व टाळायचे असेल तर अगदी प्रत्येक व्यक्तीने या धरतीला सुंदर ठेवण्याचा संकल्प करणे भाग आहे.

*****