Home राजधानी मुंबई खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

27

मुंबई : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये ( working shift ) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थितीदेखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here