Home राष्ट्रीय दोन मुलांबाबत सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण

दोन मुलांबाबत सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण

82

राष्ट्रीय राजधानी : देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन अपत्य धोरण लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे [ ashvinee chaube ] यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण आकडेवारीनुसार २००५-०६ साली २ पूर्णांक ७ दशांश टक्के असणारा देशातील प्रजनन दर २०१५-१६ साली २ पूर्णांक २ दशांश टक्के इतका खाली आल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आवश्यक अन्नधान्याचे भाव स्थिर राखण्यासाठी वेळोवेळी काही उपाय योजले आहेत. यात आयात शुल्क, किमान निर्यात मूल्य यांच्या माध्यमातून निर्यात व्यवस्थापन, देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन निर्यात बंदी, साठेबाजीला आळा घालण्यासाठी दंड आदी उपायांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्यसभेत [ rajyasabha ] एका लेखी उत्तरात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here