Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य धक्कादायक : तुकाराम भिडे यांना कोरोनाची लागण

धक्कादायक : तुकाराम भिडे यांना कोरोनाची लागण

88

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जगावरच ताबा मिळवल्याचे दिसून येत आहे. अशातच आता तुकाराम भिडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आपण सर्वजण तुकाराम भिडे अर्थातच मंदार चांदवडकर [ mandar chandvadkar] यांना ओळखतो. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ [ tarak mehata ka ulta chashma ] लोकप्रिय हास्य मालिकेत ते ‘आत्माराम तुकाराम भिडे’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

मागील काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मंदार यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच उपचार सुरू आहेत. शिवाय मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करत आहे. चाहत्यांनी काळजी करू नये़ प्रकृती स्थिर असल्याचे मंदार यांनी म्हटले आहे. या संबंधीचे वृत्त लोकमत 18 वृत्तवाहिनीने दिले आहे.

 

जितकी बोल्ड तितकीच अभिनयसंपन्न…