Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र राज्यात दररोज तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

राज्यात दररोज तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

67

मुंबई : राज्यात दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण करायचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ chief minister udhav thakare] यांनी दिले आहेत. ते राज्यभरातील विभागीय आयुक्तांसोबत ‘दूरदृश्य प्रणाली’च्या माध्यमातून झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली, तरी लसीकरणाला वेग देण्याचे आव्हान आहे. प्राधान्यक्रम निश्चित केलेल्याचे लसीकरण येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. उन्हाळ्याचे दिवस पाहता लसीकरण केंद्रांवर नागरिकांना सर्व सुविधा मिळतील याची सुनिश्चिती करावी़ कोरोनाच्या बदलत्या लक्षणांची नोंद करावी आणि त्यानुसार उपचाराकरता मार्गदर्शकतत्त्वे जारी करण्याचीही सूचनाही त्यांनी बैठकीत केली.

 

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

कौशल्य विद्यापीठे स्थापनेसंदर्भात छाननी समिती गठित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here