परमबीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ई-मेल पत्राबाबत शहानिशा

राजधानी मुंबई

मुंबई : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ई-मेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत [ home department ] संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ई-मेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ई-मेल तपासून घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत [ cmo ] स्पष्ट करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *