Home उपराजधानी नागपूर नागपुरात 31 मार्चपर्यंत अंशात्मक शिथिलीकरणासह कडक निर्बंध

नागपुरात 31 मार्चपर्यंत अंशात्मक शिथिलीकरणासह कडक निर्बंध

76

नागपूर : नागपूर महानगर परिसरात वाढत असलेली रुग्ण संख्या बघता 15 ते 21 मार्चपर्यंत असणारे कडक निर्बंध आता 31 पर्यंत काही अंशात्मक शिथिलीकरणासह सुरू राहणार आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, व्यापारी-उद्योजक-दुकानदार संघटना, माध्यम प्रतिनिधीशी आॅनलाईन चर्चा केल्यानंतर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ niteen raut ] यांनी 31 पर्यंत नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

बैठकीला महसूल व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, केंद्रीय मंत्री भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस [ devendra fadanvees ] , खासदार कृपाल तुमाने,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, प्रवीण दटके, अभिजित वंजारी, कृष्णा खोपडे, मोहन मते, राजू पारवे आदी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महानगरपालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल तसेच पोलिस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दूरदृश्य प्रणालीद्वारे व प्रत्यक्ष उपस्थित होते.

नागपूर शहरात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाबाबतच्या सूचना दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व व्यापारी प्रतिष्ठान, उद्योजक, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, विविध संघटनेचे प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधी व संपादक यांच्याकडून आमंत्रित करण्यात आल्या. कोरोनासंदर्भातील राबविण्यात येणाºया विविध उपाययोजनांबाबत उपयुक्त सूचना विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या.

नितीन गडकरी यांनी केंद्र शासनामार्फत कोणतीही मदत लागली तर ती विनाविलंब केल्या जाईल. पालकमंत्री यांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा व सर्व पक्षाचे नेते उभे आहेत़ सोबतच जिल्ह्यातील धर्मदाय संस्था व स्वयंसेवी संस्था यांनी देखील लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्याचे आवाहन केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ग्रामीण भागांमध्ये कोरोना चाचणीचे केंद्र तातडीने वाढविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नागरिकांवर सक्ती करण्यासोबतच त्यांना आवश्यक कामांसाठी कारण विचारुन परवानगी देण्याबाबतही निर्देशित केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेयो व मेडिकल येथील सद्य:स्थितीचा आढावा घेतला गरीब रुग्णांसाठी आजही शासकीय रुग्णालय महत्त्वपूर्ण असून या ठिकाणी बेडची उपलब्धता व आवश्यक सोयी परिपूर्ण राहतील याची खातरजमा करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी ग्रामीण भागातील उपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण सुरू करण्याबाबत विनंती केली. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी लसीकरण मोहीम एखाद्या सार्वजनिक मोहिमेप्रमाणे सुरू ठेवावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने त्याचा लाभ व्हावा अशी मागणी केली. खासदार कृपाल तुमाने यांनी ग्रामीण भागात आवश्यक आरोग्य सेवा व लसीकरणाला केंद्र उपलब्ध करण्याची मागणी केली.

बदल असे…
31 मार्चपर्यंतच्या कडक निर्बंधात जीवनावश्यक वस्तू सुलभतेने होतील, असे नियोजन केले आहे. भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंची दुकाने यापूर्वी दुपारी एकपर्यंत सुरू होती, ती आता 4 वाजेपर्यंत उघडी राहतील. रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री सायंकाळी सातपर्यंत तर आॅनलाईन सेवा रात्री 11 पर्यंत सुरू असेल. रस्त्यावरील गर्दी, अनावश्यक फिरणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे पोलिस विभागाला सक्त निर्देश दिले आहेत. पोलिसांनीही योद्धा म्हणून जबाबदारी सांभाळावी.

31 मार्चपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये शाळा-महाविद्यालय बंद राहतील. मात्र, केंद्र व राज्यस्तरावरील पूर्व नियोजित परीक्षा कोविड प्रोटोकॉल पाळत घेण्यात येणार आहेत. शहरात 3 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेºयाची व्यवस्था करण्यात आली असून पॉझिटिव्ह रुग्ण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शिथिलतेबाबत महानगर पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना प्रसारित करतील.