Home राजधानी मुंबई ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जारी केलेल्या नियमांच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जारी केलेल्या नियमांच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

55

मुंबई : ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’साठी सरकारने जारी केलेल्या नियमांच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर [ PRAKASH JAVADEKAR ] यांनी सांगितले.
ते शनिवारी मुंबईत एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात बोलत होते.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रशासनात पारदर्शकता आली असून हा एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल डिजिटल [ DIGITAL ] क्रांतीमुळे घडून आल्याचे जावडेकर यांनी यावेळी नमूद केले. सुमारे १२ कोटी ३० लाख शेतकºयांच्या खात्यामध्ये २ हजार रुपये एका क्लिकवर जमा आहेत. किरकोळ खर्चासाठीही आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कोविड काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ५० व्हर्च्युअल बैठका झाल्याची माहिती जावडेकर यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here