Home राजधानी मुंबई माजी पोलिस आयुक्ताच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक

माजी पोलिस आयुक्ताच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत महत्त्वाची बैठक

99

मुंबई : शरद पवार [ SHARAD PAWAR ] सध्या दिल्लीत असून, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपावर आज सायंकाळी 7 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते तसेच सरकारमधील मंत्री अजित पवार [ AJIT PAWAR ] आणि जयंत पाटील यांना दिल्लीतच बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रिपद बदलण्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

राजीनामा नाही…
माजी पोलिस आयुक्ताच्या पत्रामुळे सरकारमध्ये विशेषत्वने राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली मंत्री जयंत पाटील यांनी अनिल देशमुख हे चांगले काम करत असून राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय नाही स्पष्ट केले आहे.
आहे. दुसरीकडे भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने जोरदार रेटली असून, आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना त्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here