Home राजधानी मुंबई महाराष्ट्राच्या गृहखात्याची जबाबदारी आता येणार ‘यांच्या’वर…

महाराष्ट्राच्या गृहखात्याची जबाबदारी आता येणार ‘यांच्या’वर…

110

मुंबई : मागील दोन दिवसांत गृहमंत्री अनिल देशमुख [ Anil Deshmukh ] यांच्या राजीनाम्याचे वृत्त येत असतानाच आता गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील [ dilip valase patil ] यांचे नाव समोर आले आहे.

गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून सुरुवातीला वित्त मंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही नाव समोर आले होते. मात्र, गृहमंत्री गंभीर आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणताही धोका पत्करणार नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच गृहमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे आले आहे.

दिलीप वळसे पाटील हे शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्रिपद बहाल करण्याचा विचार पक्षाकडून सुरू असल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

यापूवी सुमारे दीड वर्षांपूर्वीची स्थिती लक्षात घेतली असता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. कारण शिवसेनेने भाजपापासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असतानाच अचानक अजित पवार यांनी भाजपसोबत जात सर्वांनाच धक्का दिला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार कोसळले; परंतु तरीही महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करताना तारेवरची कसरत करावी लागली होती. नेमक्या याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. परिणामी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.