दुथडी पूर एखादी नदी वा नाला पार करणे धोकादायक असते़ अनेकदा आपण हजारदा विचार करतो़ कुठे आग लागली असेल ती विझवण्याचा प्रयत्न करून; परंतु आत शिरण्याचा धोका कधीही पत्करणार नाही़ मात्र, धगधगत्या ज्वालामुखीवरून कुणी जाण्याचा अर्थात ओलांडण्याचा प्रयत्न केला तर…आणि तेही एका महिलेने!
ही गोष्टही खरी आहे. 32 वर्षी महिलेने हा अद्भूत पराक्रम केला आहे. करिना ओलियानी [ Karina Oliani ] असे तिचे नाव असून ती ब्राझील देशातील आहे.
इथिओपियाच्या अफार प्रांतात एर्टा आले नावाचा ज्वालामुखी असून, येथील उकळता लाव्हा सतत वाहत असतो. जगातील सर्वाधिक तापमान या सरोवराच्या सभोवताली असते. याला पृथ्वीचा सर्वात उष्ण भागदेखील म्हणतात. हेच ठिकाण ब्राझीलची साहसी करिना ओलियानी हिने दोरीच्या मदतीने ओलांडला आहे.
ज्वालामुखीवर एक विशेष प्रकारचा दोरखंड लावण्यात आला. यानंतर करिनाने विशेष पोषाख, हेल्मेट, आॅक्सिजन सिलिंडरच्या मदतीने उकळत्या लाव्हारसावरून ३२९ फूट ११.७ इंचाचे अंतर पार केले. धक्कादायक म्हणजे यावेळी तेथील तपमान १,१८७ अंश सेल्सियस होते. या कामगिरीनंतर करिना ओलियानीने आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोरले आहे.
समाजसेवी…
करिना वैद्यकीय तज्ज्ञ ( Brazilian doctor ) आहे. (सध्या ती कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.) तिच्याकडे हेलिकॉप्टर उडवण्याचा आणि पायलट प्रशिक्षण देण्याचा परवाना देखील आहे. जगाच्या कानाकोपºयात कोठेही आपली मोहीम पूर्ण करतानाच ती लोकांवर उपचारही करते. कधीकधी ती दुर्गम भागातही लोकांना मदत करण्यासाठी जाते.
अन्य माहितीनुसार, १२ वर्षांची असताना तिने पहिल्यांदा स्कूबा डायव्हिंगचा क्लास लावला होता. त्यानंतर ती समुद्रातील सर्वात मोठे शिकारी म्हणजे शार्क आणि व्हेल माशांबरोबर पोहणे शिकली. १७ व्या वर्षी ती ब्राझीलची वेकबोर्ड चॅम्पियन बनली.