Home सिनेरंग ‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

60

दिल्ली : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची [ national film award] घोषणा करण्यात आली असून बार्डो [ bardo ] या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता विषयावरील चित्रपटांमध्ये आनंदी गोपाळ आणि ताजमाल या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

बार्डो चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे आहेत. हा चित्रपटाचे निमार्ते रितु फिल्मस् कट एलएलपी आहेत. याच चित्रपटातील रान पेटला…गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आनंदी गोपाळ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रोडक्शन डिझाइन सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे. राष्ट्रीय एकात्मता विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ताजमाल याला जाहीर झाला आहे. नियाज मुजावर यांनी दिग्दर्शित केला असून टू लाईन स्टुडिओ प्रा.लि. यांची निर्मिती आहे. ‘ताश्कंद फाईल’ हिंदी चित्रपटासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार कस्तुरी हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. दिग्दर्शक विनोद कांबळे असून इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे.

नॉन फिचर फिल्म श्रेणी
जक्कल या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निआॅन रील क्रिएशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत. उत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक श्रेणीमध्ये खिसा चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. राज प्रितम मोरे दिग्दर्शक आहे.
सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत होली राईट्स या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागून पुरस्कार जाहीर झाला आहे. निर्मात्या प्रियंका मोरे असून दिग्दर्शक फराह खातून आहेत.

स्पेशल मेन्शन श्रेणीत दोन मराठी चित्रपट

स्पेशल मेन्शन श्रेणीत लता भगवान करे चित्रपटाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला. याच श्रेणीत पिकासोला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत. सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार अनु रूवड याला जाहीर झाला आहे. निर्माते ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले आहेत. त्रिज्या चित्रपटाला उत्कृष्ट आॅडिओग्राफी चा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटांवरील उत्कृष्ट समीक्षात्मक पुस्तक या श्रेणीत ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here