Home राजधानी मुंबई कोरोनातून बरे झाल्यावर रुग्णालयाबाहेर वाट पाहात असलेल्या काही वार्ताहरांशी संवाद साधला होता...

कोरोनातून बरे झाल्यावर रुग्णालयाबाहेर वाट पाहात असलेल्या काही वार्ताहरांशी संवाद साधला होता : अनिल देशमुख

96

नागपूर : कोरोनातून बरे झाल्यावर १५ फेब्रुवारीला नागपूरच्या अ‍ॅलेक्सिर रुग्णालयातून सुटी मिळाली तेव्हा, रुग्णालयाबाहेर वाट पाहात असलेल्या काही वार्ताहरांशी आपण संवाद साधला होता. मात्र, २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणातच होतो, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख [  Home Minister Anil Deshmukh ] यांनी दिले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी मंत्री देशमुख यांनी काही पोलिसांची भेट घेऊन त्यांना खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला होता. त्यावर देशमुख यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख हे गृहविलगीकरणात होते, त्यामुळे परमबीरसिंग यांचा हा दावा निराधार असल्याचं स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिली आहे. दुसरीकडे देशमुख या काळात लोकांना भेटत असल्याचा दावा भाजपने केला आहे. या प्रकरणासंदर्भात बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि देशमुख यांच्या राजीनाम्यासंबंधीचा योग्य तो निर्णयही मुख्यमंत्रीच घेतली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली आहे.