Home राष्ट्रीय भविष्यासाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे : पंतप्रधान

भविष्यासाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे : पंतप्रधान

85

राष्ट्रीय राजधानी : पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी [ PM NARENDRA MODI ] यांनी म्हटले आहे. ते सोमवारी जागतिक जलदिनानिमित्ताने जलशक्ती अभियान-कॅच द रेन या मोहिमेचा प्रारंभ करताना बोलत होते.

जलशक्ती अभियानाविषयी जागरुकता वाढत आहे. गाव खेड्यातील लोक पावसाचे पाणी वाचवण्याचा, पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाच्या पाण्याचे अधिक चांगले व्यवस्थापन केल्यास देशाचे भूजलावरील अवलंबित्व कमी होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, देशभरात 22 मार्च ते 30 नोव्हेंबर 2021 या काळात जलशक्ती अभियान-कॅच द रेन [ CATCH THE RAIN ] मोहीम राबवण्यात येत आहे.