ओमानचे दिवंगत सुलतान काबूस बिन सईद अल सईद अल सईद यांना ‘गांधी शांतता पुरस्कार’ मरणोत्तर प्रदान

राष्ट्रीय

राष्ट्रीय राजधानी : ओमानचे दिवंगत सुलतान काबूस बिन सईद अल सईद अल सईद यांना २०१९ सालचा गांधी शांतता पुरस्कार [ gandhi peace award ]  मरणोत्तर प्रदान केला गेला. एक कोटी रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, पारंपरिक हस्तकलेची वस्तू असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

काबूस बिन सईद अल सईद यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसक आणि गांधीजींच्या मार्गावर चालत दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंती वर्षासून केंद्र सरकारनं या पुरस्काराची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *