Home उपराजधानी नागपूर ‘क्षयरोगमुक्त नागपूर’साठी मनपा राबविणार विविध उपक्रम

‘क्षयरोगमुक्त नागपूर’साठी मनपा राबविणार विविध उपक्रम

33

नागपूर : जिल्हा व शहर क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र्र शासनाच्या सूचनेनुसार नागपूर महानगरपालिकाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना क्षयरोग दिनाच्या निमित्ताने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
२४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे सन २०२५ पर्यत ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यात क्षयरोगाचे निदान, क्षयरोग्यांवर उपचार, निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षयरोग्यांना योग्य आहार, याअंतर्गत होणाºया उपचारांवर प्रतिमहिना ५०० रुपयांची मदत, गंभीर आजारांचे व्यवस्थापन आदीची अंमलबजावणी आणि जनजागृती करण्यात येणार आहे. क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार [ dr. shilpa jichkar ] यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here