Home राजधानी मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी कोरोनाबाधित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी कोरोनाबाधित

49

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे [ rashmi udhhav thakare] यांनी 11 मार्च रोजी कोवॅक्सिन लस टोचून घेतली होती.

माहितीनुसार, 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता रश्मी ठाकरे यांचा कोरोनाही अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्र्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here