भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय

भोपाळ : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. यात 12 महिला आणि रिक्षाचालकाचा समावेश आहे.

माहितीनुसार, सर्व महिला अंगणवाडीतील मुलांसाठी आपापल्या शाळामध्ये पोषण आहार बनवण्यासाठी जात होत्या. जुनी छावणी परिसरात मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरून धडक दिली. यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलिस अधिकाºयांनुसार, रिक्षामध्ये अधिक प्रवासी होते.

दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त करत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *