आता कोरोना लसीचा दुसरा डोज दीड ते दोन महिन्यानंतर

राष्ट्रीय

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या दोन डोजमध्ये दीड ते दोन महिन्यांचे अंतर वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

देशात पुन्हा एकदा वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान लसीकरण अभियानाला गती आली असतानाच सरकारने कोरोनाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, कोविशिल्ड लशीच्या दोन डोजमध्ये आता चार च्या ऐवजी 6 ते 8 आठवड्यांचे (दीड ते दोन महिने) अंतर असेल.

देशात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात सध्या प्रकारच्या लशीचा वापर केला जात आहे. पहिली लस देशातील ‘भारत बायोटेक’ची कोवॅक्सिन [ covaccine]  आणि दुसरी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाची [ syrum institute of india ] कोविशिल्डचा [ covishield ]  समावेश आहे. यापैकी कोविशिल्डबाबत केंद्र सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. यानुसार कोविशिल्डचा दुसरा डोज 6 ते 8 आठवड्यांनंतर दिला जाईल.

हेही वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी कोरोनाबाधित
कोविड प्रतिबंधात्मक लस ४५ वर्षांवरील सर्वांना देण्याची मागणी केंद्राकडून मान्य

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *