Home उपराजधानी नागपूर तज्ज्ञ म्हणतात, मुखावरण घालून फिरावे लागणार

तज्ज्ञ म्हणतात, मुखावरण घालून फिरावे लागणार

39

नागपूर : जगभरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे किंवा काही देशात आली सुद्धा! एकीकडे लसीकरण सुरू असल्याने कोरोना [ CORONA -19 ] महामारीवर आपण नक्की मात करू, असा दावाही काही जागतिक तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. लसीकरणानंतरही मुखावरण-मास्क (MASK), वारंवार हात धुणे आणि शारीरिक दूरता-सोशल डिस्टन्सिंग (SOCIAL DISTANCING) नियमांचे (TRI- RULE) पालन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आपला देश वा विदेश कोरोनासंबंधी ट्राय रुलचे पालन करण्यात शिथिलता आलेली आहे.
दुसरीकडे मागील दिवसात इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाअंतर्गत लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ. मेरी रॅमसे यांनी पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच शारीरिक दूरता पाळत तोंडावर मुखावरण घालून फिरावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जगभरातील लोकांनीच स्वत:ला आता काही प्रमाणात निर्बंधांची सवय लावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. याआधारेच आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे. जास्त उपस्थिती असणाºयांना कार्यक्रमांना शक्यतो टाळत अपवादात्मक स्थिती करावयाचे झाल्यास आयोजकांबरोबरच प्रशासनालाही अधिक काळजीपूर्वक पद्धतीने लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच, कार्यक्रमांसंदर्भात स्पष्ट नियम आखून देण्याचीही गरज आहे. जगभरातील सर्वच भागांमध्ये कोरोना लसीकरण (VACCINATION) योग्य प्रमाणामध्ये झाल्यास त्यानंतर जगभरातील बांधितांची संख्या कमी झाल्याने थोडी फार परिस्थिती ‘कोरोनापूर्व’ काळासारखी असेल, असा आशावाद डॉ. रॅमसे यांनी व्यक्त केला आहे.

जगभरातील सर्वच सरकारी यंत्रणांनी अगदी विचारपूर्वक पद्धतीने निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय आणि काळजी घेण्याचे अभिप्रेत केले आहे. कुणीही तातडीने निर्बंध उठवण्याची घाई करू नये. वयस्कर व्यक्तींना आणि इतर आजार असणाºयांना कोरोनाचा अगदी वेगाने संसर्ग होऊ शकतो हा धोका गांभीर्यपूर्वक लक्षात घेणे गरजेचे असल्याचा इशाराही डॉ. रॅमसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here