ब्लॉग : कोरोनाचा वर्षभराचा काळ वेदनांचा !

ब्लॉग

नूतन मोरे

मित्रांनो, आज 24 मार्च…लक्षात आहे ना! निश्चितच असणाऱ़ क़ारण बरोबर एक वर्षापूर्वी केंद्र सरकारने 24 मार्च 2020 रोजी कोरोना लॉकडाऊन ( LOCKDOWN) घोषित केला होता. देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेणे भाग पडले होते. अत्यंत अकल्पित अशा आरोग्यविषयक संकटामुळे देशात काहीशी चिंतेची स्थिती निर्माण झाली होती.

शिवाय संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) या कोरोना संकटाला ‘महामारी’ म्हणून घोषित केल्याने ही बाब केवळ कोणत्याही एका देशापुरती उरली नव्हती, ती एक जगाच्या अस्तित्वावरच उठली होती. त्यामुळे प्रत्येक देशाने निर्बंध घालून घेतले. त्यामुळे परस्परांतील संपर्क तुटला. आर्थिक साखळी तुटली़ आपत्कालिन सेवाशिवाय कारखाने, उद्योगधंदे, कंपन्या बंद पडल्या़ सारे आर्थिकचक्र जागीच थांबले. काही कंपन्यांनी सुरुवातीला काही कळ सोसत नंतर मात्र कामगारांना कामावरून कमी कमी केले, काहींच्या वेळा बदलल्या, कामांचे तास कमी केले. मोठमोठ्या आणि आर्थिक संपन्नेच्या कंपन्यांनीही तोच पावित्र उचलला. यात माहिती तंत्रज्ञान कंपन्याही ( IT COMAPIES ) पुढे होत्या. यानंतर ‘घरातून काम’ ( WORK FROM HOME ) हा नवा प्रकार उदयास आला, जो एक वर्षानंतर सध्याही सुरू आहे. याशिवाय शाळांसह शैक्षणिक संस्था थांबल्या. मागील (2019-2020)आणि सध्याचे शैक्षणिक वर्ष (2020-2021) पूर्णपणे थांबले़ आॅनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यातून होणारी प्रगती एकूण विकासात कितपत जोडता येईल, ही सुद्धा मोठी समस्या आहे.

लाचार मानव
कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांत विपरित परिणाम झाला तो समाजावर! यातून भाड्याने वास्तव्य करत असलेल्या आणि रुग्णालयात सेवा देणाºया डॉक्टरांनाही घर रिकामे करण्यास भाग पाडण्यात आले. अनेक वैद्यकीय मंडळी रुग्णालयातच वास्तव्यास होती. कोरोनाबाधितांवरही लोकवस्त्यांतून बहिष्कार घालण्यात आला. मग त्यातून आयुष्य संपविणे (स्वत:चा आत्मघात) असे प्रकारही घडले. कुणी कोरोना आजार होण्याच्या भीतीने तर कुणी आर्थिक तंगीत आल्याने मृत्यूला जवळ केले. आधुनिकता, यंत्र-तंत्र युगाच्या काळात सूर्य-चंद्र-मंगळ अशा ठिकाणी जाण्याच्या भाषा करणारा, क्षणात जग नष्ट करण्याची शक्ती असलेला मानव या काळात मात्र अतिशय अगतिक आणि लाचार दिसून आला़ कोरोनाने मृत्यू झालेल्यांना घरी आणता येत नव्हते. रुग्णालयातून प्रशासनाच्या चार व्यक्ती थेट अन्त्यसंस्कारासाठी घेऊन जात होते. अतिशय दीन अशा स्थितीत मानवी जीव अडकून पडला.

दुसरीकडे घरीच थांबावे लागल्याने रोजगार बंद पडले़ लहान मोठे व्यावसायिक, ठेल्यावरून व्यवसाय करणारे फेरीवाले, चहाटपरी, भाजीपाला विकणारे असे अनेकजण घरात अडकून पडले. त्यामुळे हाताला कामच नसल्याने पैसा येणार कसा? त्यामुळे समाजातील अनेकांनी वैयक्तिक, संस्थांमार्फत अन्नधान्याची मदत केली़ अतिशय भावनात्मक तुटलेल्यांना आधार देण्यात आला.

पर्यावरण, हवामानात बदल
मागील अनेक वर्षापासून पर्यावरणात होणाºया बदलाला कारणीभूत ठरलेल्या मानवाच्या दुष्कृत्यात अडकलेल्या पर्यावरणाने मात्र मोकळा श्वास घेतला. स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल इतक्या प्रमाणात प्रदूषण कमी झाले. रस्त्यांवर आधीसारखी वाहने दिसून येत नव्हती. औद्योगिक क्षेत्रात ( INDUATRIES SECTOR) २४ तास न थकता प्रदूषण सोडणारे धूरकांडेही बंद होते. अनेक कंपन्यांमधून नद्यांमध्ये जाणारे प्रदूषित पाणीही कोरडे पडले. स्फोटकांनी डोंगर पोखरणे थांबले, खाणींमधील काम बंद पडले; परंतु निसर्ग मूळ रुप अनुभवायला आले. पंजाब राज्यातून हिमालयची पांढरी शुभ्र शिखरे दिसून आली, हे इतके वातावरण स्वच्छ झाले होते. जंगलातील प्राणी मानवी वस्तीजवळ दिसून आले. प्राणी गावात तर मनुष्य घरात असा तो क्षण साºया जगाने अनुभवला. मुख्यत्वे देशातील धुळीचे प्रमाण कमी झाल्याने, प्रदूषण थांबल्याने ताप, सर्दी-पडश्याचे रुग्ण घटल्याचे दिसून आले.

 

हवालदिल मजूर
या सर्वांत भरडला गेला तो मजूरवर्ग, लहान मोठ्या उद्योग-कारखान्यातून काम करणारा कामगार. यात परप्रांतिय मजुरांना बरेच हाल सहन करावे लागले़ प्रवास साधने नसल्याने महाराष्ट्र वा अन्य प्रदेशात रोजगारानिमित्ताने आलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा राज्यातील मजुरांनाआपल्या लेकराबाळांसह कित्येक किमी पायी प्रवास केल्याचे दिसून आहे.

निसर्गाने संधी दिली…
सर्व काही बंद राहिल्याने काही चांगलाही परिणाम दिसून आला. कोरोना संकट कायमचे राहणारे नाही़ यावर आपण मात करू, आर्थिक घडीही स्थिावरता येईल; परंतु त्यासाठी अशाप्रकारची किंमत मोजायची का? यावर आधी निर्णय घ्यावा लागणार आहे. निसर्गानेच आम्हाला तशी संधी दिली़ मात्र, त्यासाठी नियतीने बरेच काही ओरबाडून नेले. यापासून आपण काही शिकलो नाही तर पुन्हा निसर्ग हस्तक्षेप करेल आणि नियती पुन्हा ओरबाडून नेईल…तूर्तास इतकेच!

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *