Home BREAKING NEWS बंधन भासे उंबरा, होते तुझ्याविना दूर…

बंधन भासे उंबरा, होते तुझ्याविना दूर…

104

आस

बंधन भासे उंबरा, होते तुझ्याविना दूर
पण तुझिया भेटी मन आतूर आतूर

गुंतले सदा हास्यात तुझ्यात मी दंग
अन् रमले गमले गंधात भिजले धुंद

प्रियसा क्षणिक नको रे तुझी सोबत
हात हवा तुझा चढण्या वळणघाट

जीवनी खडतर वाटेवरी हवास तू
सांग ना माझाच होशील का रे तू

***

सपान

चांदणं पडलं रातीला सपान आलं
चांदणी हवी चंद्राला एकांत आपुल्या साथीला

जग झालं विश्रांत
चल घेऊ मोकळा श्वास
श्वासात अडकला प्राण सख्या
घेऊ हातात हात
चांदणं पडलं रातीला सपान आलं…

सख्या का असा लांब
मजसी घे कुशीत
कर शांत या देहास
वेच तू यौवन ओंजळीत
चांदणं पडलं रातीला सपान आलं…

नूतन मोरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here