Home राजधानी मुंबई माझीच चौकशी करावी, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माझीच चौकशी करावी, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

91

मुंबई : खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख [ home minister anil deshmukh ] यांनी माजी पोलिस आयुक्तांनी केलेल्या आरोपाप्रकरणी आपली चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ cm udhhav thakare ] यांच्याकडे केली आहे.

आपल्यावर होत असल्याने सरकारकडून आपली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी रात्री पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्याचे समजते. निवृत्त न्यायमूर्ती यांच्याद्वारे चौकशी होणार आहे.
दुसरीकडे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे.