Home उपराजधानी नागपूर पुणे, पालघर, मुंबईत होळी सण आणि रंगपंचमी सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास मनाई

पुणे, पालघर, मुंबईत होळी सण आणि रंगपंचमी सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास मनाई

53

नागपूर : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्यात आगामी होळी स्ण आणि रंगपंचमी सार्वजनिक ठिकाणी साजरा करायला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मनाई केली आहे.

हॉटेल्स, रिसॉर्ट आणि सार्वजनिक सभागृह आदी सर्व ठिकाणी तसेच गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागांमध्ये हा दोन दिवसीय सण साजरा करता येणार नाही. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्ह जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

यापूर्वी मुंबईतही होळी सण सार्वजनिकरित्या साजरी न करण्याच्या सूचना केल्या असून, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक ठिकाणी, रंगपंचमी साजरी करायला मनाई केली आहे. दरम्यान, नागपुरात शहर वा जिल्ह्यात असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही.