नवी दिल्ली : जागतिक नेमबाजी क्रीडा महासंघ -आयएसएसएफच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या वर्ल्डकप-२०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत [ tejasnini savant ] हिने सुवर्णपदक पटकावले आहे.
५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिक्स्ड टीम इव्हेंट प्रकारात तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या दोघांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स टीम इव्हेंटमध्येही भारताने सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत १२ सुवर्ण पदकांसह २५ पदके पटकावत भारत पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.