Home BREAKING NEWS लहान मुलांना कोरोनाचा धोका नाही, हा भ्रम ठेवू नका.

लहान मुलांना कोरोनाचा धोका नाही, हा भ्रम ठेवू नका.

72

नागपूर : ज्येष्ठ, तरुण यांच्याप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाचा धोका आहे. मागील तीन महिन्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचीही नोंद झालेली आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोनाचा धोका नाही, हा भ्रम ठेवू नका. लहान मुलांमध्ये दिसणाºया लक्षणांना गांभीर्याने घ्यावे. लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त नसला तरी त्यांच्यामुळे इतरांना होणारा धोका मोठा आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्या. एसएमएस (सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टंसिंग) या त्रिसूत्रीचे स्वत: पालन करा व मुलांनाही त्याचे अनुकरण करायला लावा, असा सल्ला प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तसेच महाराष्ट्र मेडिकल काँसिलचे [ maharashtra medical counsil ] उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी व न्यूरॉन हॉस्पिटलच्या संचालक डॉ. मंजूषा गिरी यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह [ facebook live ] कार्यक्रमात डॉ. विंकी रुघवानी व डॉ. मंजूषा गिरी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. लहान मुलांना कोरोना होतो का, त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे का, त्यांना कोरोनाचा धोका आहे का, अशी विविध प्रश्न यावेळी दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांना विचारण्यात आली.

सध्या कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल दिसून येत आहे. खोकला, सर्दी, ताप या लक्षणांसोबतच पोटदुखी, हगवण, उलटी, थकवा, कमजोरी ही सर्व लक्षणे कोरोनाबाधितांमध्ये दिसून येतात. त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांचीही पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त नसला तरी ते सर्वात मोठे वाहक ठरू शकतात. त्यामुळे बाहेर खेळायला जाताना मुलांना अवश्य मास्क लावायला सांगा. त्यांना कुठलीही लक्षणे आढळल्यास त्याला सहज घेउ नका. त्यामुळे घरातील ज्येष्ठांना धोका होऊ शकतो. त्यामुळे नियमांचे पालन करा, असे आवाहनही डॉ. विंकी रुघवानी व डॉ. मंजूषा गिरी यांनी केले.