तब्बल 19 दिवस आणि 12 तासांची रात्रीची संचारबंदी

उपराजधानी नागपूर राजधानी मुंबई

नागपूर / मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा प्रकोप राज्यात वाढत असताना दररोजच्या आवाहनानंतरही राज्यातील लोकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आज 28 मार्चपासून रोज रात्री आठ वाजतापासून दुसºया दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी ( NIGHT CURFEW ) लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 [ Disaster Management Act ] आणि महामारी आजार कायदा 1897 [ Epidemic Diseases act ] यांनुसार 15 एप्रिलपर्यंत हे नवे निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत.

रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये, पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडून नये यावर बंदी घातली आहे. मुखावरण (मास्क) न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास, शारीरिक दूरता (सोशल डिस्टन्सिंग) अशा नियमांचे पालन न करणाºयास तातडीने जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या सेवा बंद
रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजनिक आस्थापना बंद राहतील. हॉटेल, बार, सिनेमागृह सुद्धा बंद ठेवल्या जातील. या काळात घरपोच सेवा (होम डिलिव्हरी सर्व्हिस) मात्र सुरू राहील. मुखावरण न लावता कुणीही व्यक्ती आढळली तर 500 रुपयांचा दंड करण्यात येणार असून, रस्त्यावर थुंकल्यास 1000 रुपये वसूल करण्यात येतील.

नवे नियम असे…

फेस कव्हरिंग्ज : सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी ‘फेस कव्हर’ घालणे अनिवार्य आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास तर 500 रुपये इतका दंड
सामाजिक अंतर : शारीरिक दूरता नियमानुसार दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फुटांचे अंतर एकमेकांमध्ये ठेवणे बंधनकारक आहे.
दुकाने, रेस्टॉरंट, मॉल आदी ठिकाणी ग्राहकांमधील अंतर न पाळल्यास कडक कारवाई. एका वेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी मिळणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू, सीटीसी वापरण्यास मनाई आहे.
वर्क फ्रॉम होम : शक्य असेल तिथे घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बाजारपेठा, खासगी आणि सरकारी कार्यालयात पूर्ण संख्येने कर्मचारी नसतील.
कामाच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्येही किमान 6 फुटांचं अंतर दोन व्यक्तींमध्ये असलेच पाहिजे. त्यासाठी पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम करावे. कर्मचाºयांच्या जेवणाच्या वेळा, लिफ्टमधल्या गर्दीवरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
गृह अलगीकरण : एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्याला घरीच विलगीकरणात ( HOME ISOLATION ) राहण्याचा सल्ला मिळाल्यास अशा घरावर, सोसायटीवर किमान 14 दिवस ‘कोविड पॉझिटिव्ह’ व्यक्ती घरात आहे, अशी पाटी लावण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *