Home राजधानी मुंबई शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल, शस्त्रक्रिया होणार

शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल, शस्त्रक्रिया होणार

62

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार [ SHARAD PAWAR ADMITTED ] यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे उद्या, 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, शरद पवार आज सकाळी ब्रीच कँडीमध्ये तपासणीसाठी आले होते. पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना शस्त्रक्रियाचा सल्ला दिला. त्यामुळे बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी पुढील सगळे कार्यक्रम रद्द केले असून, पश्चिम बंगालमधील प्रचारालाही जाता येणार नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी त्यांचा दौरा नियोजित होता.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांच्यावर 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील दोन आठवडे ते घरीच विश्रांती करतील.